Amritsagar Dudh Sanghani made Diwali sweet for its employees 
अहिल्यानगर

अमृतसागर दूध संघानी केली कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

शांताराम काळे

अकोले : अमृतसागर दूध संघाकडून दूधउत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया दरफरक (रिबेट) देण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दोन हजार रुपये पगारवाढ व 15 टक्के बोनस देण्याचाही निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

त्यात दूध दरफरकापोटी 2 कोटी 44 लाख, पेमेंटचे 2 कोटी 50 लाख, बोनससाठी 35 लाख, व्यापारी देणे 10 लाख, असे साडेपाच कोटी रुपये बॅंकेत वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी दिली. 

अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, विठ्ठल चासकर, शरद चौधरी, भाऊ पाटील नवले, सोपान मांडे, रामदास आंबरे, सुभाष बेनके, प्रवीण धुमाळ आदी उपस्थित होते. 

पिचड म्हणाले, की कोरोनामुळे सर्व व्यवसायांवर परिणाम झाला. दूधउत्पादकांनाही त्याचा मोठा फटका बसला. पूर्वी 32 ते 33 रुपये प्रतिलिटर असलेला दर अचानक 20 ते 25 रुपयांपर्यंत खाली आला. संघ 3 ते 4 रुपये लिटर तोटा सहन करून उत्पादकांना 25 रुपये दर देत होता. दुसरीकडे, खासगी संघ 20-21 रुपये प्रतिलिटरप्रमाणे दुधाची खरेदी करीत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Short Circuit During EV Charging: फोर व्हिलर चार्जिंगला लावून झोपी गेले... नंतर EV मध्ये लागली आग, कुटुंबातील ८ जण जीवंत जळाले!

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

Pune Crime : पुणे हादरले ! उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT