Anna Hajare Sakal
अहिल्यानगर

पारनेर : वाईन विक्री विरोधातील आण्णा हजारेंचे उपोषण तूर्त स्थगित

आज झालेल्या ग्रामसभेत हजारे यांनी उपोषण करू नये असा हात उंचावून बहुमताने निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या (ता.14) सोमवार पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. मात्र आज झालेल्या ग्रामसभेत हजारे यांनी उपोषण करू नये असा हात उंचावून बहुमताने निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी उद्या पासून सुरू करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

सरकारने वाईन विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात हजारे आंदोलन करणार होते.हा निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून आपण निर्णय मागे घेतला नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाच्या प्रधान सचिव वत्सा नायर यांनी हजारे यांची राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून काळ भेट घेतली होती या वेळी त्यांनी राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली होती.

आज यादवबाब मंदिरासमोर सावळेराम पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हजारे म्हणाले ग्रामसभा सर्वोच्च असते त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे मात्र तरी सुद्धा सरकारला या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी तीन महिन्याची मी मुदत देत आहे असेही हजारे यांनी या वेळी जाहीर केले.

ग्रामस्थांनी या वयात अण्णांनी उपोषण करू नये असे भावनिक आवाहन करताना अरुण भालेकर म्हणाले राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेने सरकारला विनंती केली की असे निर्णय सरकारने घेऊ नये. हजारे म्हणाले लोकसभा व विधानसभा यांची ग्रामसभा जननी आहे वाईन जर किराणा दुकानात ठेवली तर लहान मुले तरुणहीव्यसनाधीन होतील संत तुकाराम, शिवाजी महाराज , ज्ञानेश्वर यांच्या संस्काराची संस्कृती महाराष्ट्र ची आहे.

या निर्णयामुळे अनेक पिढ्या बरबाद होतील वाईन विक्री साठी दुकाने कमी आहेत का मग किराणा दुकानात कशासाठी असाही प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला.सरकारला लोकांना व्यसनाधिन बनवायचा का समाज व्यसनाधीन झाला तर सरकार आपली हित साध्य करता येईल असेही हजारे म्हणाले.

मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही असा निरोप दिला होता युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. वाईन ही महाराष्ट्र ची संस्कृती नाही.असा निरोप दिल्यानंतर सरकार च्या हालचाली सुरु झाल्या . जनतेला विचारात घेतल्याशिवाय वाईन बाबतीत निर्णय घेणार नाहीअसे आश्वासन शासनाने दिले आहे तसे पत्रही दिले आहे.

-अण्णा हजारे जेष्ठ समाजसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT