Anna Hazare holds a tricolor rally from Ralegan Siddhi to Parner on Republic Day.jpg 
अहिल्यानगर

शेतक-यांसाठी राळेगणसिद्धीत तिरंगा ट्रॅक्टर रॅली

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : दिल्लीत शेतक-यांनी जी तिरंगा रॅली काढली त्यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवार व परिसरातील गावांनी राळेगणसिद्धी ते पारनेर अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढली. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी एकटे नाहीत. त्यांच्या मागे संपूर्ण देशातील शेतकरी आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सांगितले.

राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिर ते पारनेर तहसिल कार्यालय अशी ट्रॅक्टर तिरंगा रॅली मंगळवारी (ता. २६) सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला, यावेळी हजारे बोलत होते. परिसरातील सुमारे ५० पेक्षा अधिक ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झाले होते. शेतक-यांनी ट्रॅक्टरला तिरंगा झेंडे लावले होते.

या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अण्णा हजारे झिंदाबाद, अण्णा हजारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अण्णा हजारे आंधी...है देश के दुसरे गांधी है, शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी राळेगणसिद्धी व पारनेर तहसिल कार्यालय परिसर दुमदुमून गेला. राळेगणसिद्धी व पंचक्रोशीतील शेतकरी ट्रॅक्टरसह आंदोलनात सहभागी झाले होते. पानोली मार्गे पारनेर येथे फुले चौकात रॅली पोहचल्यानंतर शेतकऱ्यांनी भारत माता की जय, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतक-यांमध्ये जोश भरला. त्यानंतर पारनेर तहसिल कार्यलयासमोर रॅली पोहचली. शेतक-यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, भाकपचे तालुका सचिव संतोष खोडदे, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष रामदास भोसले, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, शंकर नगरे, अंकुश गायकवाड, दादा पठारे, संदिप पठारे, दिलीप देशमुख, दत्ता आवारी, शाम पठाडे, किसन मापारी, सुभाष पठारे, नानाभाऊ मापारी, रमेश औटी, अनिल मापारी, रोहिदास पठारे, सदाशिव पठारे, गणेश भापकर, सुभाष गाजरे, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते.

तीन कृषी कायदे रद्द व्हावेत, शेतीमालाला हमीभाव देणारा सुरक्षा कायदा व्हावा, यासाठी दिल्लीत दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. तर हजारे यांनी स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासाठी (ता. ३०) जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. या दोन्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, असे माजी सरपंच जयसिंग मापारी व लाभेष औटी यांनी सांगितले.

मी अण्णांच्या पहिल्या आंदोलनापासून सहभागी होत आलेलो आहे. अण्णांचे सर्व आंदोलने ही सामान्य जनतेसाठीच असतात. आज शेतकरी आंदोलन हा महत्त्वाचा व देशातील सर्व शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. माझे वय झाले असले तरी मी मनाने तरुण आहे.
- रघुनाथ औटी, वयोवृद्ध शेतकरी, राळेगणसिद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT