Anna sakal
अहिल्यानगर

आण्णा हजारेंनी वाईनविक्रीला विरोध करु नये; द्राक्षे उत्पादकांची मागणी

राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : राज्यात सुमारे 10हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. व सुमारे 40हजार द्राक्ष बागायतदार आहेत.त्यामुळे सरकारने सुप्रमार्केट मधून वाईन विक्री चा घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध करू नये अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.

या वेळी द्राक्ष बागायतदार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांच्या नेतृत्वाखाली हजारे यांना निवेदन देण्यात आले.सरकारच्या वाईन विक्री विरोधात हजारे यांनी सोमवार (ता.14 ) पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता . या पार्श्वभूमीवर राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेने हजारे यांची भेट घेऊन सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.या वेळी भोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले राज्य सरकारने सुपर मार्केट व दुकानातून वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया चे राज्यातील द्राक्ष बागायतदार संघटनेच्या वतीने आम्ही स्वागत करतो . या निर्णयाचे राजकारण करून द्राक्ष उतपादक शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नये.वाईनला दारू म्हणून हीनऊ नये.आम्ही आमच्या समस्या हजारे यांना सांगितल्या आहेत आमच्या मताचा हजेरी आदर करतील अशी अपेक्षा आहे.

सरकार फळांच्या प्रोसेसिंग साठी अनुदान देते हा सुद्धा द्राक्षाचा रसच आहे.याची तुलना दारुशी करू नये. वाईन विक्रीचा निर्णय रद्द झाला तर द्राक्ष उत्पादकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असेही भोसले म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT