Anna Hazare warning to enter the fray again for Gram Sabha Act 
अहिल्यानगर

ग्रामसभेच्या कायद्यासाठी अण्णा हजारे यांचा पुन्हा रिंगणात उतरण्याचा इशारा

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : लोकशाहीच्या य़शस्वीतेसाठी व बळकटीसाठी ग्रामसभेला जादा अधिकार देणाऱ्या कायद्याची गरज आहे. तसा कायदा देशभरात सर्व राज्यातही होण्यासाठी हा कायदा करणे गरजेचे आहे.

त्यासाठी जनशक्तीच्या दबावाची गरज आहे. म्हणून लोकपाल कायद्याप्रमाणे सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा एकत्र यावे, असे अवाहन करत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जणू पुन्हा एकदा ग्रामसंभेच्या कायद्यासाठी देशव्यापी दुसऱ्या आंदोलानाचा इशाराच दिली आहे.

संविधान दिनाचे औचित्य साधून हजारे यांनी जनजागृती व लोकशिक्षण या हेतूने एक व्हिडिओ प्रसारीत करूण संदेश दिला आहे. त्यात हजारे यांनी म्हटले आहे की, देशात लोकशाही य़शस्वी करावयाची असेल तर ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा होणे गरजेचे आहे. सरकार फक्त जनतेच्या आंदोलनापुढे झुकते. आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार देण्याची मागणी हजारे यांनी आपल्या संदेशातून केली आहे. 

हजारे यांनी पुढे म्हटले आहे की, देशात ख-या अर्थाने लोकशाही आणावयची असेल तर जनतेमध्ये सरकारला झुकविणारी शक्ती उभी करावी लागेल व ती जनतेने ऊभी करावी असं आवाहनही त्यांनी आपल्या संदेशातून केले आहे. कोणतेही सरकार आंदोलनास घाबरत नाही, तर ते सत्तेवरून पायऊतार होण्यास म्हणजेच पडण्याला घाबरते. त्यासाठी आंदोलानांच्या माध्यमातून जनतेने देशव्यापी जनरेटा निर्माण करणे गरजेचे आहे. जनआंदोलनातून सरकारवर दबावगट तयार होतो. त्यामुळे सरकार जनतेला घाबरून जनहिताचे निर्णय घेते व जनहिताचे कायदे करते असेही हजारे यांनी म्हटले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा देशात खरी लोकशाही आली नाही. अनेक पक्ष त्यात निर्माण झालेली झुंडशाही या मुळे जनतेला खरी लोकशाही मिळाली नाही. देशात संसद, राज्यात विधानसभा तशी गावात ग्रामसभा व शहरात प्रभाग सभा अशी रचना करणारा कायदा होणे देशात होणे गरजेचे असून ही आमची गेली अनेक दिवसापासून ची मागणी आहे सरकारी खजिना जनतेच्या मालकीचा आहे त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक झाले पाहिजेत. गावातील सर्व निर्णय ग्रामसभेच्या संमतीने घेणे गरजेचे आहे. कारण जनता मालक आहे. 

स्वातंत्र्यानंतरही जनआंदोलनातून अनेक कायदे तयार झाले आहेत आता ख-या लोकशाहीसाठी लढा देणे गरजेचे आहे. जनआंदोलन हे मोठे हत्यार आहे याचा विसर जनतेला पडला आहे. लोकपाल आंदोलनाच्या वेळी जनता ज्या प्रमाणे जागृत झाली त्याच प्रमाणे पुन्हा जागृत झाल्यास लोकशाही बळकट करणारा ग्रामसभेला जादा अधिकाराचा कायदा देशात होऊ शकतो असेही शेवटी हजारे यांनी शेवटी म्हटले आहे. त्यातून हजारे यांनी दुस-या देशव्यापी आंदोलनाचा सरकारला इशाराच दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT