dilip walse patil esakal
अहिल्यानगर

बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार! वळसे-पाटलांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

निघोज (जि. अहमदनगर) : बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.मागील तीन वर्षापासून त्यावर सुनावणी झाली नव्हती. कोरोना असल्यामुळे न्यायालयात हा विषय आला नाही. मात्र आता सरकारी वकील ॲड. सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यातील बैलगाडा मालकांकडून (bullock cart owner) मागणी होत असताना बैलगाडा मालका वरील जुने गुन्हे मागे घेणार असल्याची गृहमंत्री वळसे-पाटील (home minister dilip walse patil) यांनी मोठी घोषणा केल्यामुळे बैलगाडा मालकामध्ये उत्साह संचारला आहे. मंचर येथे राज्यांचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी ही घोषणा केली. वळसे पाटील म्हणाले की काही दिवसातच बैलगाडा मालकांवर चे सर्व गुन्हे मागे घेणार आहे. मात्र गुन्हे मागे घेतले म्हणून बैलगाडा मालकांनी परत गुन्हे करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

बैलगाडा मालकामध्ये उत्साह

बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.मागील तीन वर्षापासून त्यावर सुनावणी झाली नव्हती. कोरोना असल्यामुळे न्यायालयात हा विषय आला नाही. मात्र आता सरकारी वकील ॲड. सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. सरकारने न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी मोठे वकील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द करून शर्यत सुरु करणे हा एकमेव मार्ग असून बैलगाडा मालकांनी विनाकारण गैरसमज करून घेऊ नये. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय शर्यतीचा प्रश्न सुटणार नाही. केंद्र सरकारने बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये केला आहे. तेथून बैल हा शब्द वगळल्यास फायदा होईल. बैलगाडा मालकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेऊ, सर्वांची त्यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न राहील, असे वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याने या निर्णयाचे पारनेर तालुक्यातील बैलगाडा मालकांनी स्वागत केले आहे. मात्र राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत. यासाठी आम्ही लढा सुरुच ठेवणार आहोत अशी माहिती नीलेश काळे, अर्जुन लामखडे, गोरख बोदगे, अविनाश लाळगे, रुपेश वरखडे, गोरख पठारे, संतोष शिनारे, दत्ता चाटे, गणेश ढवण, तुषार लामखडे, गुंडा भोसले, अक्षय लामखडे, नारायण रसाळ आदी बैलगाडा मालकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT