The annual general meeting of the District Primary Teachers Co-operative Bank was held online on Sunday 
अहिल्यानगर

विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी नरमले; राज्य कार्यक्षेत्राचा विषय स्थगित

दौलत झावरे

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे राज्य कार्यक्षेत्र करण्याच्या ठरावाला विरोधकांसह सभासदांनी हरकत घेतली. त्यामुळे संचालक मंडळावर हा ठराव स्थगित करण्याची वेळ आली.
 
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाइन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष राजू राहाणे होते. उपाध्यक्ष उषा बनकर, संचालक शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाट, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख, बाळासाहेब मुखेकर, सीमा क्षीरसागर, विद्युल्लता आढाव, दिलीप औताडे, किसन खेमनर, राजू मुंगसे, बाबासाहेब खरात, अविनाश निंबोरे, संतोष आकोलकर, अनिल भवार, सलीमखान पठाण, गंगाराम गोडे, मंजूषा नरवडे, सुयोग पवार ,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे आदी उपस्थित होते. सकाळी दहा वाजता सभा सुरू झाली. राहाणे यांनी अहवाल वाचन केले. विकास डावखरे यांनी बॅंकेच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

त्यावर गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे म्हणाले, घड्याळ खरेदी माजी अध्यक्षांच्या निर्णयानुसार झाली आहे. यात गैरव्यवहार झालेला नाही. काहींनी 45 मिनिटे वेळ घेऊन सभेला गालबोट लावले, असे ते म्हणाले. प्रवीण ठुबे यांनी रात्रीतून अहवाल बदलल्याची टीका केली.

त्यावर अध्यक्ष राजू राहाणे म्हणाले, अहवालाच्या छपाईत चूक झाली. ही मानवी चूक असून, त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी विरोधकांनी आरोप केले आहेत. 

बॅंक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांच्यासह संचालकांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. माजी अध्यक्ष साहेबराव आनाप यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेत संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, राजू साळवे, एल. पी. नरसाळे, मीनल शेळके, विकास डावखरे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र ठोकळ, संतोष वाघमोडे, विठ्ठल काळे यांनी सहभाग घेतला. 

बारा विषय मंजूर 
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सभेत एकूण 13 विषय ठेवण्यात आले होते. त्यातील 12 विषय मंजूर झालेले असून, बॅंकेचे राज्य कार्यक्षेत्रचा विषय स्थगित करण्यात आला.

सभासदांच्या भावना लक्षात घेऊन बॅंकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याचा विषय पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे. 
- राजू राहाणे, अध्यक्ष, जिल्हा प्राथमिक बॅंक. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT