Anuradha Nagwade of the Congress also became unopposed 
अहिल्यानगर

भाजपला पु्न्हा जबर धक्का ः काँग्रेसच्या अनुराधा नागवडेही झाल्या बिनविरोध

संजय आ. काटे

श्रीगोंदे : जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप यांनी बिनविरोध बाजी मारली. त्यांच्याच पाठोपाठ काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे याही बिनविरोध बँकेत गेल्या आहेत.

एकाचवेळी आघाडीचे हे दोन दिग्गज बिनविरोध झाल्याने तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा फिरल्याचे चित्र झाले आहे. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना हा जबर धक्का आहे. महाविकास आघाडीने भाजपला चांगलेच पेचात पकडले आहे.

राहुल जगताप हे सेवा संस्था मतदारसंघातून निवडले गेले तर महिला मतदारसंघातून अनुराधा वहिनींनी बाजी मारली. दोघांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राहूल जगताप यांनी बिनविरोध लढाई जिंकताना विरोधकांचे सगळे मनसुबे उधळले. ही बातमी तालुक्यात आली आणि एकच जल्लोष झाला. हा जल्लोष सुरू झाला, आणि काँग्रेस नेत्या व जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे याही बिनविरोध झाल्याचा निरोप आला.ते श्रीगोंद्याच्या राजकारणात दुधात साखर पडल्याचे मानले जाते.

वडील कुंडलिकराव तात्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या राहूल जगताप यांच्यानंतर सासरे शिवाजीराव बापूंचे स्वप्नही साकार करण्याचा मान अनुराधा नागवडे यांनी मिळविला.

या दोन दिवंगत नेत्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्या राहूल जगताप व अनुराधा नागवडे यांच्या या निवडी भविष्यात भारतीय जनता पक्षासाठी मात्र अडचणीच्या ठरणार आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT