Any work of the Gadakh family in Newash is so different! 
अहिल्यानगर

नेवाशात गडाख कुटुंबाचं कोणतंही काम असं हटके असतंय!

सुनील गर्जे

नेवासे : मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाने दर्जेदार विकासकामांच्या माध्यमातून नेवासे शहरासह उपनागराचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास महिला बचतगट चळवळीच्या नेत्या  व पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केला. 

नेवासे नगर पंचायत अंतर्गत  साडेतीन कोटी रुपयांच्या निधीचे शहरातील  रस्ता काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, भुयारी गटारी अशा विविध विकास कामांचा  मॅरेथॉन शुभारंभ  रविवार (ता. ३१) रोजी माजी सभापती  गडाख यांच्या  हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

यावेळी हभप नंदकिशोर महाराज खरात,  गहिनीनाथ महाराज आढाव, नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, नारायण लोखंडे, अनिल ताके, दिलीप जामदार, पोपट जिरे,  अंबादास लष्करे आदी नगरसेवक उपस्थित होते. 

सुनीता गडाख म्हणाल्या, "नेवासे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत. नेवासकरांनीदेखील सहकार्याची भूमिका घेऊन चांगल्या कामाच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. कामे दर्जेदार होण्यासाठी नागरिकांनी देखील लक्ष घालावे आम्हाला सूचना  कराव्यात. ठेकेदार यांनी देखील कामे दर्जेदार  करावीत. 

सुनिता गडाख यांच्यासह त्यात्या प्रभागातील महिलांच्या हस्ते शहरातील खळवाडी,  देशमुख गल्ली, लोखंडे गल्ली, कामिनपीर, नुराणी मस्जिद,  रामकृष्ण नगर , ज्ञानेश्वर मंदिर रस्ता परिसर, गंगानगर,  लक्ष्मीनगर,  अहिल्यानगर अशा शहर व उपनगरातील विविध एकूण नऊ प्रभागातील कामांचा प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. आभार सतीश पिंपळे यांनी मानले.

महिलांच्या हस्ते 'श्रीफळ' 
नेवासे शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्या-त्या प्रभागातील महिलांच्या हस्ते  विकास कामांचा 'श्रीफळ'  वाढवून करण्याचा नवीन पायंडा  नगरपंचायतच्या वतीने पाडण्यात आला. शहराच्या  विकास कामांत  महिलांचाही सक्रिय सहभाग यानिमित्ताने राहणार आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जयंत पाटील वाढदिवस साजरा करणार नाही; कार्यकर्त्यांनाही केलं आवाहन

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशहा 'किम जोंग उन' यांचा उत्तराधिकारी ठरला?

T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

SCROLL FOR NEXT