Apli kharedi aplya Kopargaon sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : खरेदी आता कोपरगावमध्ये; व्यापारी महासंघाकडून ग्राहक सन्मान योजनेचा प्रारंभ

योजनेंतर्गत ग्राहकांना लाखो रुपयांची शेकडो बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष सुधीर डागा, तुलसीदास खुबानी, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : विजयादशमी,  दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक बाजारपेठेला व व्यापाऱ्यांना चालना मिळावी या उद्देशातून तालुका व्यापारी महासंघ आणि तालुका किराणा मर्चंट असोसिएशनतर्फे ‘आपली खरेदी आपल्या कोपरगावात’ ही ग्राहक सन्मान योजना आणली.

योजनेंतर्गत ग्राहकांना लाखो रुपयांची शेकडो बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष सुधीर डागा, तुलसीदास खुबानी,  किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.

योजनेचे मुख्य प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व सहप्रायोजक संजीवनी उद्योग समूह आहेत. या प्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या चैताली काळे,  संजीवनी महिला बचत गटाच्या रेणुका कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी सुहास जगताप उपस्थित होते. चैताली काळे म्हणाल्या,  तालुक्यातील नागरिकांनी सणालाच नाही, तर नेहमी स्थानिक बाजारपेठ, व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

रेणुका कोल्हे म्हणाल्या, संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंब नेहमीच स्थानिक बाजारपेठ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  गुन्हेगारीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. सुधीर डागा, प्रदीप साखरे यांनी ५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरू आहे. १७ नोव्हेंबरला लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे आहे.

स्थानिक व्यापारी कोपरगावकरांच्या मदतीसाठी नेहमीच धावून आले. विशेषतः कोरोना काळात दिलेली ग्राहक सेवा, गरजवंताना पुरविलेली घरपोहोच भोजन डब्यांची योजना आजही समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. बस स्थानकाचे सुशोभीकरण करून व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनने महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला आहे.

- काका कोयटे, अध्यक्ष, तालुका व्यापारी महासंघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT