श्रीगोंद्यात सफरचंद ई सकाळ
अहिल्यानगर

स्ट्रॉबेरीत पिकवली सफरचंद, श्रीगोंद्याच्या तरूणाची शेती बघाच

संजय आ. काटे

श्रीगोंदे : शेतीत आधुनिकतेची कास धरीत बेलवंडी कोठार (ता. श्रीगोंदे) येथील नितीन अरुण कोठारे या तरुणाने येथील वातावरणात आता स्ट्रॉबेरीसोबतच सफरचंदाची लागवड केली आहे. दोन वर्षांपासून तो स्ट्रॉबेरी लावत आहे. सफरचंदाचा प्रयोग यशस्वी ठरल्याने तालुक्यासह नगर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

सतरा एकर शेती, त्यात तेरा एकर फळबाग आहे. वर्षाकाठी पंचवीस लाखांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणारा नितीन जिवापाड मेहनत घेतोय. नितीनला शेतीची आवड असल्याने तो आधुनिक शेती कशी करायची, याचा शोध घेत होता. त्याने बारावीनंतर ऍग्री इंजिनिअरिंगची पदवी घेतली व शेतीत झोकून दिले.

आठ वर्षांपासून तो शेतीत घाम गाळतोय. हे शिक्षण सुरू असतानाच त्याने एक हजार डाळिंब रोपे लावली. मात्र, शिक्षणासोबत शेती करणे त्याला जमले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर पहिल्याच वर्षी, म्हणजे 2015मध्ये डाळिंब, कलिंगड, खरबूज या पिकातून पंचवीस लाखांचा नफा मिळविणारे भक्कम उत्पन्न घेतले. यात साडेसतरा लाख फक्त डाळिंबाचे असल्याचे नितीन सांगत होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

एक एकराचा शेततलाव

याच नफ्यातून दोन एकर द्राक्ष लागवड केली. एक एकराचा शेततलाव करीत, शेतीसाठी लागणारी वाहनेही घेतली व पुन्हा एकदा शेतीत नवे प्रयोग सुरू केले. द्राक्ष लावले, त्या वर्षी त्यातच आंतरपीक म्हणून कलिंगड आणि हिरवी मिरची घेतली आणि त्यातही फायदा मिळविला.

कर्जाची भानगड नाही

कर्ज काढण्याच्या भानगडीत तो पडत नाही. शेतीच्या पैशातूनच कामे करायची, असे सांगत नितीन म्हणाला, की सतरापैकी तेरा एकर शेतीला ठिबक सिंचन केले आहे. दोन वर्षांपासून तो वीस गुंठ्यांवर स्ट्रॉबेरी लावतोय. या हवामानात चांगले उत्पन्न घेतले आहे. त्यातच आंतरपीक म्हणून सफरचंदांची चाळीस झाडे लावली आणि आता त्यांना फळे लागली आहेत. त्याची रोपे जम्मूहून मागविली. पाऊण लाखापर्यंत खर्च करून, त्यातून निव्वळ नफा दीड लाखापर्यंत कमावल्याचे तो सांगतोय. ही स्ट्रॉबेरी स्थानिक बाजारपेठेसह सिद्धटेकला विकली.

आंतरपिकाला महत्त्व, जांभूळशेती

नितीन कोठारे प्रत्येक मुख्य पिकात आंतरपीक घेत नफा साधतोय. आता त्याने जांभूळशेतीचा प्रयोग केला आहे. पिकाच्या नियोजनाला त्याने महत्त्व दिले आहे. आधुनिकतेची जोड देतानाच, स्वत: शेतात कष्ट करण्याची सवय ठेवल्याने नफ्याचे प्रमाण वाढल्याचे तो सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT