Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

Thane Firing : गंभीर जखमी पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून आणखी तीन ते चार आरोपींचा शोध सुरू आहे.
Thane Manpada Firing: Pradeep Purnekar Killed

Thane Manpada Firing: Pradeep Purnekar Killed

esakal

Updated on: 

Thane Manpada Firing: Pradeep Purnekar Killed : ठाण्यातील मानपाडा-मनोरमानगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com