shrirampur bajar samiti 
अहिल्यानगर

श्रीरामपूर बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती

गौरव साळुंके

श्रीरामपूर (नगर) : येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार संचालक मंडळ सहा महिन्यासाठी पुढे कायम ठेवायचे की काय करायचे. प्रशासक नेमणुकीच्या निर्णयासाठी १५ दिवसांची मुदत मिळाली होती. परंतु मुदत संपूनही निर्णय न झाल्याने अखेर आज येथील बाजार समितीवर प्रशासकाच्या नेमणुकीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिल्याची माहिती सचिव किशोर काळे यांनी दिली. सदर माहिती मिळताच सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती मिळविली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतबाह्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नियुक्त्या झाल्या. तसेच राज्यातील विविध बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला मुदतवाढी मिळाल्या. परंतु श्रीरामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच सप्टेंबरला मुदत संपली आणि आज प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले. 

दरम्यान, येथील संचालक मंडळाने मुदतवाढीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान, संचालक मंडळाला सहा महिन्यांसाठी कायम ठेवायचे की, प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेण्यासाठी खंडपीठाने १५ दिवसांची मुदत दिली होती. १५ दिवस उलटूनही संचालक मंडळाने हालचाल न केल्याने अखेर आज प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले. त्याची माहिती मिळताच सत्ताधारी गटाने तत्काळ खंडपीठात धाव घेतली. त्यामुळे प्रशासक नियुक्तीला अंतरिम स्थगिती देत संचालक मंडळाला पुढील आठ दिवस कामकाज पाहण्यास मुदतवाढ दिल्याचे संचालक दिपक पटारे यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thank You India! लिहीत इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला, कठोर निर्णयामागचं नेमकं कारण काय?

जाऊ द्या ना काका... ! तिलक वर्माला मुंबई पोलिसांनी अडवले? Video Viral

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

SCROLL FOR NEXT