Appointment of Plateau on Parner Taluka Milk Team 
अहिल्यानगर

नीलेश लंकेंचे धक्कातंत्र सुरूच, पारनेर तालुका दूध संघावर पठारे यांची वर्णी

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे पुनर्जीविन करण्यात आले होते. त्या साठी एक वर्षाच्या कालावधीकरीता समितीही नियुक्ती केली होती.

त्या समितीची मुदत संपल्यानंतर त्यांनी सहकारी नियमानुसार निवडणूक घेणे क्रमप्राप्त असताना निवडणूक न घेतल्याने ती समिती बरखास्त करून नव्याने दादासाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती नेमण्यात आली आहे.

त्यामुळे खासदार सुजय विखे व माजी आमदार विजय औटी समर्थक राहुल शिंदे यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.
नवनियुक्त आलेली समिती त्रिसदस्यीय आहे. समितीच्या अध्यक्षपदी पठारे यांची तर सदस्य म्हणून संभाजी रोहोकले व सुरेश रावसाहेब थोरात यांची निवड केली आहे.

तालुका दूध संघाचे 16 नोव्हेंबर 2017 रोजी पुनजीवन करण्यात आले होते. नंतर हंगामी समितीची एक वर्षासाठी नेमणूक केली होती. त्या समितीची मुदत 15 नोव्हेंबर 2018 रोजी समाप्त झाली होती. त्या समितीने मुदत संपण्यापूर्वी राज्याच्या सहकारी संस्थेच्या नियमानुसार निवडणूक घेणे गरजेचे असताना त्यांनी मुदतीत निवडणुक घेतली नाही.

या बाबत  आमदार नीलेश लंके यांनी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे संस्थेवर प्रशासक नियुक्तीची व गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केली होती.
त्या नंतर एन.ए. ठोंबरे यांची लेखापरीक्षक म्हणून नेमणुक केली गेली. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालात नारायण गव्हाण येथील सरकारी दुध शीतकरण केंद्र खरेदी पोटी 16 लाख 86 हजार रूपये  इतकी रक्कम शासकीय दुध योजणनेकडे 28 सप्टेंबर 2007 रोजी भरली. मात्र, आजअखेर मालमत्तेचे हस्तांतरण व खरेदीखत केले नाही.

संघाच्या मालकीचे सुपे येथील दुध शीतकरण केंद्र अनेक वर्षापासून बंद आहे. त्या ठिकाणची साधनसामुग्री निरुपयोगी झाली. ती विकण्याची जाहीरात प्रसिद्ध केली. मात्र, ती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा अहवाल दिला आहे.    

सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार समितीचा नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर नवीन समिती पदावर येईपर्यंत संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी संस्थेचे तीनपेक्षा अधिक सदस्य मिळून समिती किंवा अधिकारी नियुक्तीची तरतूद असल्याने न जुन्या समितीची मुदत संपल्याने व त्यांनी निवडणुक प्रक्रिया राबविणे गरजेचे असतानाही ती न राबविल्याने पठारे यांच्या अध्यक्षतेखाली रोहकले व थोरात यांची त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती राज्याच्या पशु व दुग्ध विकास मंत्रालयाने केली. या प्रशासक नियुक्तीमुळे आमदार लंके यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्रांचा आवलंब केला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT