Tukaram Gabhale Sakal
अहिल्यानगर

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचणारा 'वनपुरुष'

शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काही लोकांनी आपले जीवन व्यतीत केलेले असते. पर्यावरण म्हणजेच आपले जीवन समजून त्यासाठी निष्ठेने आयुष्यभर काम केलेले असते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तुकाराम भोरु गभाले राहणार मान्हेरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.

वन पुरुष म्हणून ख्याती असलेले तुकाराम बाबा आपल्या परिसरातील गावांमध्ये हिरवाई निर्माण व्हावी, पारंपारिक जंगलांचे जतन व्हावे व त्यात वृद्धी व्हावी यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले आहे.सध्या ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहेत. परंतु निसर्गाची शाळा त्यांनी कधीही बंद होऊ दिली नाही. निसर्गाच्या शाळेत शिकत राहणे व समाजाला प्रेरित करत राहणे हेच ध्येय त्यांनी आयुष्यात ठेवलेले आहे.

बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने व सहभागाने त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. सुमारे 20 ते 25 लक्ष विविध उपयोगी वृक्षांची लागवड आणि संवर्धन ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी केलेले आहे. मान्हेरे कोदणी, रंधा, लाडगाव, टिटवी, डोंगरवाडी , पिंपरकणे आंबेवंगण अशा विविध गावांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने साग ,बांबू ,अकेशिया, काशीद, शिवन, आंबा, काजू , जांभूळ, सुबाभूळ यांचा समावेश होतो. तुकाराम बाबांनी स्वतःचे माळरान ज्या पद्धतीने वृक्षवेलींनी सजवले आहे ते बघता स्थानिक शेतकऱ्यांना एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे. आंबा, चिकू ,पेरू, लिंबू, सीताफळ, रामफळ, ब्राझिलियन चेरी, केळी, हिरडा, बेहडा, जांभूळ, साग, बांबू , ऐन ,चंदन, सादडा, खैर, सीसम, अर्जुन, काटे सावर, बहवा, शिंधी , बेल , अशा कितीतरी प्रकारच्या वनस्पतींचे त्यांनी स्वतःच्या शेतावर संवर्धन केले आहे . यासोबतच अनेक औषधी वनस्पती त्यांचा शेतावर संवर्धित केलेल्या आहेत यामध्ये गावठी शतावरी , आडुळसा निर्गुडी, गावठी हळद, रान केळी, चितृक, चिचूर्डा, नागफणी यासह अनेक वनस्पतींचा यात समावेश होतो.

याशिवाय त्यांनी दालचिनी मिरे, यासारखे मसाल्याचे पीक शेतावर यसस्वी करून दाखवले आहे. विविध वनस्पतींच्या सानिध्यात वनराजीने नटलेल्या जागेवर आजही त्यांचे वास्तव्य आहे. गुरुजी मोठ्या आनंदाने वृक्ष लागवडी बद्दल विद्यार्थी, शिक्षक गावातील तरून, बचत गटातील महिला, विविध विकास करणाऱ्या यंत्रणा यांना आजही मोठ्या उत्साहात मार्गदर्शन करत असतात. शेतावर लावलेली झाडे म्हणजे आपले निवृत्ती वेतन आहे असे ते स्वाभिमानाने सांगतात. शेतावर लावलेल्या फळझाडांच्या माध्यमाने त्यांना जीवन चरितार्थ चालवणे सुखकर झाले आहे. गुरुजींनी उभे केलेले वन आणि फळ शेतीचे मॉडेल आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी उत्तम उदाहरण म्हणता येईल. तुकाराम बाबांनी सुरू केलेले हे मिशन तरुणांनी नक्की पुढे नेले पाहिजे हीच त्यांची अपेक्षा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

Latest Marathi News Live Update : युद्धाच्या परिणामामुळे इंधन दरात वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

SCROLL FOR NEXT