Asha Seviks are paid Rs. 16 for Corona Survey 
अहिल्यानगर

कोरोना सर्वे ः बापरे आशा सेविकांना किती हा पगार, तब्बल १६ रूपये

शांताराम काळे

अकोले : कोरोनापासून संरक्षणासाठी कोणतीही पुरेशी साधने न देता, महिला कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे राबवून घेणे थांबवा. स्थानिक विकास निधीतून कोरोना सर्व्हेसाठी आशा सेविकांना दरमहा किमान तीन हजार, तर आशा गटप्रवर्तकांना किमान 5 हजार रुपये अतिरिक्त मानधन द्या, अन्यथा या कामावर बहिष्कार घालण्याचा इशारा सिटू संलग्न जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेने दिला. 

कोरोना सर्व्हेसाठी आशा सेविकांना रोज 33 रुपये, तर आशा गट प्रवर्तकांना 16 रुपयांत राबवून घेतले जात आहे.

आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन दिले. पुढील आठ दिवसांत यावर निर्णय न झाल्यास, कोरोना सर्व्हेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला. ग्रामपंचायत व पालिका स्तरावर उपलब्ध असलेल्या स्थानिक विकास निधीतून दरमहा तीन हजार रुपये कोरोना सर्व्हेसाठी तरतूद करणे अवघड नाही.

नेत्यांच्या सत्कारासाठी हजारो रुपयांचा चुराडा करणाऱ्या ग्रामपंचायती व पालिका अशी तरतूद करायला तयार नसतील, तर आशासेविकाही परिवाराचा जीव धोक्‍यात घालून केवळ 33 रुपयांसाठी सर्व्हे करणार नाहीत, अशी भूमिका संघटनेने घेतली.

आशासेविकांना सॅनिटायझर, ग्लोज, मास्कसह इतर पुरेशी संरक्षण साधने द्या, कोरोना संसर्ग झाल्यास, आशा कर्मचारी, गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबाला प्राधान्याने तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करून द्या, तालुक्‍यातच कोरोना चाचणीची पुरेशी सुविधा उपलब्ध करा, खानापूर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुरेशा सुविधा द्याव्यात, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

भारती गायकवाड, संगीता साळवे, सुनीता गजे, अस्मिता कोते, सुजाता गायके, मंगल गावंडे, चित्रा हासे, चित्रा डगळे, आशा उगले, जानका परते, रुपाली तातळे, स्वाती ताजणे, मनीषा मंडलिक, शालिनी वाकचौरे, नैना पांडे, संगीता धुमाळ, आशा देशमुख, चंद्रकला हासे आदींनी विविध समस्या मांडल्या. 

तहसीलदार कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे यांनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने दिली. आशा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला किसान सभेचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, खंडू वाकचौरे, युवक संघटनेचे एकनाथ मेंगाळ, देवराम डोके व जनवादी महिला संघटनेच्या जुबेदा मणियार, सुमन इरणक यांनी पाठिंबा व्यक्त केला.

संपादन - अशोक निंबाळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT