Ashtavinayak yatra by helicopter ahmednagar sakal
अहिल्यानगर

आता हेलिकॉप्टरने अष्टविनायक यात्रा !

भाविकांसाठी हवाईयात्रेची पर्वणी; पाच तासांत होणार सर्व बाप्पांचे दर्शन

सचिन गुरव

सिद्धटेक : आद्य पूजेचा मान असणाऱ्या श्रीगणेशाचे दर्शन, अर्थात अष्टविनायक यात्रा पायी, सायकल, तसेच दोन-तीन दिवसांत बाईकवर करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र, याहीपुढे जात, आता अवघ्या काही तासांतच अष्टविनायक यात्रा सुफळ संपूर्ण होणार आहे. हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक यात्रा कधी सुरू होणार, याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. सोमवारी, म्हणजेच संकष्टी चतुर्थीपासून या यात्रेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

देश-विदेशातील ज्या भाविकांची अत्यंत कमी वेळेत अष्टविनायक यात्रा करण्याची इच्छा आहे, अशा व्हीआयपी भक्तांसाठी ही यात्रा अवघ्या पाच तासांत पूर्ण होणार आहे. अष्टविनायकांतील ओझर या ठिकाणाहून ही यात्रा सुरू होऊन, लेण्याद्री येथे ती पूर्ण होईल.

यात्रा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला भाविकांना ओझरला मुक्कामी जावे लागेल. तेथे त्यांची व्यवस्था व्हीआयपी सूटमध्ये केली आहे. यात्रेला सुरवात होण्यापूर्वी ओझरच्या श्री विघ्नहर गणेशाला अभिषेक व आरती केल्यानंतर तेथून हेलिकॉप्टर भाविकांना घेऊन उड्डाण करेल. यासाठी ओझर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त गणेश कवडे यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले आहे. देवस्थानने भाडेकरारावर हेलिकॉप्टर घेतले आहे. आवश्यक त्या सर्व प्रशासकीय मान्यताही मिळविल्या आहेत.

हेलिकॉप्टर यात्रेचा मार्ग

  • ओझर- रांजणगाव- सिद्धटेक- थेऊर- मोरगाव- महड- पाली- लेण्याद्री

  • यात्रेचा खर्च- एक लाख प्रतिव्यक्ती

  • हेलिकॉप्टर आठ आसनी आहे

दुसरे आकर्षण

सन १९७९ मध्ये अष्टविनायक चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून जनमानसात अष्टविनायक यात्रेबाबतची श्रद्धा द्विगुणित झाली. त्यानंतर अष्टविनायक यात्रा करणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली. त्यातच आता हेलिकॉप्टरद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध झाल्याने, यात्रेबाबतचे हे दुसरे आकर्षण ठरणार आहे. धार्मिक ठिकाणी उच्चपदस्थांचा ओघ यामुळे वाढीस लागेल. परिणामी, तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

अष्टविनायक दर्शनासाठी हेलिकॉप्टरने जाणे, हा एक सुखद अनुभव असणार आहे. याद्वारे पर्यटनास वेगळा आयाम मिळेल. कोरोना कालावधीमध्ये मरगळ आलेल्या पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असल्याने, आगामी काळात देशांतर्गत पर्यटन भरारी घेणार आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT