ashtavinayak yatra starts in helicopter sakal
अहिल्यानगर

हेलिकॉप्टरने अष्टविनायक यात्रेचा झाला 'श्रीगणेशा'

राज्यातील अष्टविनायक दर्शनातून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शनाचा पर्याय समोर आला होता.

सचिन गुरव

राज्यातील अष्टविनायक दर्शनातून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शनाचा पर्याय समोर आला होता.

सिद्धटेक - भाविकांना (Divotee) प्रसिद्ध अष्टविनायक (Ashtavinayak) तीर्थस्थळांचे दर्शन अधिक सुकर व्हावे, त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांचा ओघ वाढीस लागावा, यासाठी कमीतकमी वेळेत ही यात्रा पूर्ण व्हावी म्हणून आठही गणेशस्थानांच्या व्यवस्थापकीय समन्वयातून आज या यात्रेची चाचणी यशस्वीपणे पार पडली.सकाळी साडेदहा वाजता सहा भाविकांना घेऊन हेलिकॉप्टर (Helicopter) येथे उतरले. भाविकांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर वीस मिनिटांत हेलिकॉप्टरने पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी 'टेकऑफ' केले.

राज्यातील अष्टविनायक दर्शनातून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शनाचा पर्याय समोर आला होता. त्याचप्रमाणे देश-विदेशातील ज्या भाविकांची अत्यंत कमी वेळेत अष्टविनायक यात्रा करण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी हा पर्याय दुग्धशर्करा योगच ठरणार आहे.दरम्यान, आज सकाळी दहा वाजता अष्टविनायकातील ओझर या ठिकाणाहून ही यात्रा सुरू झाली.तर लेण्याद्री येथे पाच वाजता यात्रेची सांगता झाली. यासाठी ओझर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त गणेश कवडे यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले आहे.

त्याचबरोबर आठही ठिकाणच्या विश्वस्त मंडळींच्या समन्वयातून हे नियोजन करण्यात आले असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंदमहाराज तांबे यांनी सांगितले.त्याचप्रमाणे यात्रा फे-यांची वारंवारता व प्रवासी दराबाबतचे नियोजन काही दिवसांतच अंतिम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

ओझर देवस्थान ट्रस्टची ही खूप जुनी संकल्पना आहे.देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, इतर सातही ठिकाणचे विश्वस्त मंडळ यांचे प्रयत्न तसेच सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.एक भाविक म्हणून केवळ काही तासांतच अष्टविनायक दर्शनाचा लाभ वेगळेच समाधान देऊन जातो.

- बबन मांडे, प्रवासी भाविक व माजी अध्यक्ष, ओझर देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT