Heramb Kulkarni Esakal
अहिल्यानगर

Heramb Kulkarni: समाजसेवक व मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; पोलिस सहकार्य करत नसल्याचा पत्नीचा आरोप

मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यावर हल्ला केला आहे. यासंबधीची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरती त्यांचा पाठलाग केला. ते गाडीच्या समोर आले, त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती जवळ गेले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली. (Latest Marathi News)

अनोळखी व्यक्तींनी हातात रॉड घेऊन मारहाण केली. त्यानंतर काही वेळात ते तेथून निघून गेले. त्यानंतर हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर ४ टाके पडले आहेत.

दरम्यान यासंबधी आधिक माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 'माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.' (Marathi Tajya Batmya)

'गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही,' अशी माहिती त्यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT