पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल sakal
अहमदनगर

गोविंद मोकाटेंविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : नगर पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) यांच्याविरुद्ध शनिवारी (ता. ४) तोफखाना पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गोविंद मोकाटे याने २०१८ मध्ये फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. नंतर मेसेज करून भेटायचे असल्याचे सांगितले. वारंवर सोशल मीडियावर मेसेज करून एक दिवस घरी आला. महिलेच्या एका नातेवाइकाकडे फिजिओथेरपी घेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी उपनगरात येत राहिला. एक दिवस पती घरी नसल्याची संधी साधून त्याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर पतीला व मुलांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली.

नकार दिला असता, कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकीही दिली. एका ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडे मदतीसाठी याचना केली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्याने पोलिस ठाण्यात आणले. फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी मोकाटेंविरुद्ध अत्याचार करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे तपास करीत आहेत. आरोपी मोकाटे गुन्हा दाखल झाल्यावर फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

जेऊर परिसरात राजकीय वर्चस्व

गोविंद मोकाटे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. नगर तालुक्‍यातील बायजाबाई जेऊर परिसरात त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. नगर पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांची मुलगी सध्या बायजाबाई जेऊर गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT