attack on police squad sakal
अहिल्यानगर

नेवासे : भेंड्यात पोलिस पथकावर हल्ला!

तिघांना अटक; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : तोफखाना पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या तोफखाना व कुकाणे पोलिसांवर आरोपीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. २२) सायंकाळी घडली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन एका महिलेसह तिघांना अटक केली.

दरम्यान, हल्ला करून आरोपी फरार झाला. या प्रकरणी दोन महिलेसह पाच जणांविरोधात नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणात अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिसांना पाहिजे असलेला नेवासे तालुक्यातील भेंडे येथील सागर मच्छिंद्र धनवटे याला पकडण्यासाठी शनिवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधीर क्षीरसागर, पोलिस कॉन्स्टेबल गौतम सातपुते, विशाल केदार व कुकाणे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल अमोल साळवे हे भेंडे खुर्द येथे धनवडे यांच्या घरी गेले. पोलिसांना धनवटे हा घरीच मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत असतानाच आरोपी सागर धनवडेसह त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे नेतृत्वाखाली नेवासे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी सागर याची पत्नी सुरेखा धनवडे, वडील मच्छिंद्र रामभाऊ धनवडे, व भाऊ सचिन ऊर्फ रुद्रा मच्छिंद्र धनवडे यांना ताब्यात घेत अटक केली. हल्ल्यानंतर सागर धनवडे व त्याची बहीण सोनाली कुसळकर हे फरार झाले.या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल गौतम सातपुते यांच्या फिर्यादीवरून वरील दोन महिलांसह पाच जणांविरोधात नेवासे पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT