अहिल्यानगर

लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे - कन्हैयाकुमार

आनंद गायकवाड

संगमनेर ः ""विविध संस्कृती, जात, धर्म, वेश, भाषा असलेल्या भारतातील समृद्ध विविधता व एकात्मता वाढविण्यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे. सध्या संकटात असलेली लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे,'' असे आवाहन कम्युनिस्ट कार्यकर्ते कन्हैया कुमार यांनी केले. 

जयहिंद लोकचळवळीतर्फे आयोजित "लोकशाही' विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. कन्हैया कुमार म्हणाले, ""सत्य व अहिंसेच्या तत्त्वातून महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. राज्यघटनेने प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला. लोकशाहीमुळे देशाची सर्व क्षेत्रांत प्रगती झाली. काही शक्ती लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही लादू पाहत आहेत.

लोकशाहीच्या स्तंभांनी केंद्रीय सत्तेच्या मर्जीनुसार काम करणे चिंताजनक आहे. प्रशासन राज्यघटनेला बांधील असले पाहिजे. मात्र, ते सत्ताधाऱ्यांची मनधरणी करीत आहेत, तर माध्यमे फक्त "टीआरपी'च्या मागे धावत आहेत. त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता संशयात आहे.'' 
हाथरसच्या अत्यंत दुर्दैवी घटनेत लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवली गेली. गोरगरिबांच्या व्यथा मांडण्यासाठी उमटलेला विरोधकांचा आवाज सत्ताधारी दाबला जात आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत लोकशाहीची मूल्ये प्रत्येकाने जपली तरच यापुढील काळात लोकशाही समृद्ध होईल,'' असे कन्हैया कुमार म्हणाले. 
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की "जय हिंद'च्या ग्लोबल कॉन्फरन्समुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरोगामी विचार व भारतीय संस्कृतीचे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे.

राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या या पुरोगामी विचारांच्या चळवळीने सुसंस्कृत तरुणांच्या माध्यमातून सुदृढ समाजनिर्मितीसाठी काम सुरू आहे. सध्या देशात धार्मिक तेढ निर्माण करून चाललेले राजकारण चिंताजनक आहे. 
परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कार्लस टोर्नर (इंग्लंड), ऍड. असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरिकेचे जेरमी क्‍लेम, हिरालाल पगडाल आदींनी सहभाग घेतला. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT