police esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : दोन पोलिसांची ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी (जि. अहमदनगर)​ : दोन पोलिस कर्मचाऱ्यांमधील (2 police audio clip) आर्थिक देवाण-घेवाण या विषयावर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, मी साहेबाला हजारो रुपये आणून देतो, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, असे वक्तव्य एक पोलिस कर्मचारी करीत असल्याने, हे साहेब कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मी साहेबाला हजारो रुपये आणून देतो !

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मी व एका कर्मचाऱ्याने सकाळीच कारवाया केल्या. तेव्हा बाकीचे कुठे होते, असा प्रश्नही या क्लिपमध्ये उपस्थित केला असल्याने, ही ऑडिओ क्लिप, कोरोनाची तीव्र साथ सुरू असतानाची असल्याचे लक्षात येते. मात्र, ती विलंबाने का व्हायरल करण्यात आली, ते समजू शकत नाही. या क्लिपमध्ये एक पोलिस कर्मचारी आपला साहेबांवरील राग दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याकडे व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

मी हे तुझ्याकडे नाही बोलणार तर कोणाकडे बोलणार, असा प्रश्न उपस्थित करत एक कर्मचारी म्हणतो, की मी सगळ्यांची कामे करतो. मला कोणी रिप्लाय देत नाही. मला कोणी बोलू देत नाही. मी आज साहेबांना बोलणार. आमच्या जिवावर साहेब आहेत. आम्ही पैसे गोळा करून हजारो रुपये साहेबांना आणून देतो म्हणून तुम्हाला पैसे भेटतात. मी जर ठरवले तर मी कुणालाही पैसे मिळू देणार नाही, असा दमही हा पोलिस कर्मचारी देत असल्याने, हे साहेब कोण, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या क्लिपमध्ये ज्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आवाज आहे, त्यांतील एका कर्मचाऱ्याची बदली झाली असून, एक मात्र येथेच कार्यरत आहे.

ही ऑडिओ क्लिप मीपूर्वी ऐकली असून, या संदर्भात चौकशी करून तसा अहवाल जिल्हा पोलिसप्रमुखांकडे पाठवणार आहे. - सुहास चव्हाण, पोलिस निरीक्षक, पाथर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT