Aurangabad became Chhatrapati Sambhajinagar, the courage of the Mansainiks 
अहिल्यानगर

औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर, मनसैनिकांचे धाडस

सकाळ वृत्तसेवा

नगर : राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्‍न चर्चिला जात आहे. नगर शहरातील तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर "छत्रपती संभाजीनगर' नावाचे फलक चिटविले.

अनोखे आंदोलन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दीपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

सुमित वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर हे नाव होणे गरजेचे आहे. आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत. परंतु, नागरिकांच्या भावनांचा आदर करून "छत्रपती संभाजीनगर' हे नामांतर होणे गरजेचे आहे.

या बाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जाणाऱ्या गाड्यांवर "छत्रपती संभाजीनगर' नावाचे फलक चिकटविले आहेत. याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. 
..... 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT