मुंबई : प्रभादेवी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केजी मार्गावरील राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान वेगाने आणि बेफिकीरपणे चालवलेली होंडा सिटी कार थेट मिरवणुकीत घुसली. इंद्रा टॉवरजवळ काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरात झालेल्या या अपघातात चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.