Aurangabad High Court on Monday rejected the bail application of upsarpanch rahul sable  
अहिल्यानगर

उपसरपंच साबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : रामपूर (ता. राहुरी) येथे शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून चोरुन नळजोडणी घेऊन, पाणी चोरी केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले उपसरपंच राहुल रावसाहेब साबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळला आहे. 

रामपूरच्या ग्रामविकास अधिकारी प्रतिभा भरसाकळ यांनी साबळे यांच्या अनाधिकृत नळ जोडणीचा पंचनामा करून, गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने राहुरी पोलिस ठाण्यात पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने साबळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 मार्च रोजी साबळे यांना तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
 
याप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करतांना 'राजकिय कारणामुळे खोटया गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. आरोपी साबळे चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा' अशी विनंती केली. सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी वरील निकाल दिला. आरोपीतर्फे ॲड. आर. एन. धोर्डे व ॲड. प्रवीण दिघे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. डब्ल्यू. मुंढे यांनी बाजू मांडली.

आरोपी राहुल साबळे हे नगर जिल्हा बॅंक व डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे चिरंजीव आहेत. रामपूरचे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे किंवा पोलिसांपुढे हजर होऊन, अटक होणे. एवढेच दोन पर्याय आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT