balasaheb thorat felicitated the woman who saved the life of a child from a leopard  Sakal
अहिल्यानगर

मृत्यूच्या दाढेतून वाचवला चिमुरड्याचा जीव; धाडसी मातेचा महसूलमंत्र्यांकडून गौरव

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. नगर) : पोटच्या चार वर्षाच्या गोळ्याला बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्यावर त्वेषाने तुटून पडलेल्या, आणि मृत्यूच्या कराल दाढेतून मुलाची सुटका करणाऱ्या धाडसी मातेचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खास भेट घेवून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत गौरव केला.

नेमके काय घडले..

मागील आठवड्यात तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील माणकेश्वर मळा परिसरात ही थरारक घटना घडली होती. राहत्या घराजवळच्या शेतात जनावरांना घास कापण्यासाठी गेलेल्या कविता सागर खताळ यांचा चार वर्षांचा मुलगा घराकडून आईकडे चालला होता. सायंकाळच्या वेळी जवळच्या मक्याच्या शेतात भक्ष्याच्या शोधार्थ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या शिव या मुलावर हल्ला केला व त्याला सुमारे 200 फुटापर्यंत ओढून नेले. हे दृष्य पाहताच हाती गवसलेल्या काठीने त्याची आई कविताने बिबट्याला जोरदार प्रतिकार केला. जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तोंडातून शिकार सोडवली. गंभीर जखमी झालेल्या शिववर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याला सुमारे 37 टाके पडले होते, आता त्याची प्रकृती सुधारली आहे. या घटनेनंतर कविता खताळ यांच्या धाडसाचे तालुक्यात कौतुक झाले होते. तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्र्यांनी खताळ यांच्या घरी भेट देत, या मातेचे आवर्जून कौतुक केले.

या वेळी रामहरी कातोरे, मनिषा कोकणे, अजय फटांगरे, मुरली खताळ, अनिल काळे, रोहिदास खताळ, दत्तू कोकणे, शिवाजी वलवे, बाळासाहेब कानवडे, सरपंच रोहिदास खताळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT