Bangarwadi Stepmother and Daughter need help
Bangarwadi Stepmother and Daughter need help sakal
अहमदनगर

कुणी आधार देता का आधार?

शांताराम काळे

अकोले : तालुक्यातील बांगरवाडी येथील एकशे दोन वर्षांच्या राहीबाई किसन भांगरे व ७५ वर्षे वयाच्या सीताबाई कोंडिबा सुपे या निराधार सावत्र माय-लेकी सध्या एकमेकींचा आधार बनल्या आहेत. शासकीय कार्यालयातील अनास्थेने दोघींना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पडक्या घरकुलात प्रतिकूल परिस्थितीत या माय-लेकी जीवन कंठत आहेत.

राहीबाई यांचे कौठवाडी (बांगरवाडी) येथील किसन भांगरे यांच्याशी लग्न झाले. मूल होत नसल्याने पतीने दुसरे लग्न केले. भांगरे यांना दुसऱ्या पत्नीपासून सीताबाई ही मुलगी झाली. तिचीही कहानी काहीशी राहीबाईंसारखीच. त्यामुळे ती आपल्या सावत्र आईकडे येऊन राहत आहे. दिवसभर मजुरीला जायचे. त्यातून मिळालेल्या चार पैशांतून उपजीविका चालवायची, असा माय-लेकींचा दिनक्रम. राहीबाईंना टपाल कार्यालयातून पेन्शन मिळत होती. मात्र, नातवांनी तिचा अंगठा घेऊन पैसे काढून नेले. आज या माय-लेकी एकाकी पडल्या आहेत. बँकेत खाते उघडता येईना, कारण वैद्यकीय प्रमाणपत्र नाही. बँकेतील साहेब म्हणतो, राहीबाईंचा वैद्यकीय अहवाल द्या. डॉक्टर म्हणतात, त्यांना रुग्णालयात आणा, अशी कैफियत सीताबाईंनी मांडली. राहीबाईंना रुग्णालयात नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश भांगरे यांनी पुढाकार घेतला.

मात्र, त्यांना वाहनात बसता येईना. तलाठी, ग्रामसेवक दाद देईनात. त्यामुळे तहसीलदारांनी दखल घेऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी सीताबाईंनी यांनी केली. सरकारी कार्यालयांतील अनास्थेमुळे किती राहीबाई व सीताबाईंना वंचितांचे जीवन जगावे लागत असेल, याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

राहीबाई भांगरे व त्यांची सावत्र मुलगी सीताबाई वंचितांचे जीवन जगत आहेत. त्यांना कुणाचाही आधार नाही. निराधारांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र, अद्याप या माय-लेकींना अशा एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. प्रशासनाने योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर करावे.

- सुरेश भांगरे,उपसरपंच, कौठवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT