Beed convict sentenced to seven years for kidnapping and robbery 
अहिल्यानगर

अपहरण करून लुटणाऱ्या बीडच्या गुन्हेगारास सात वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः प्रवाशाचे अपहरण करून लुटल्याबद्दल आरोपी अतुल विक्रम वाघमारे (वय 30, रा. शिवाजीनगर, जि. बीड) याला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास सात महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. 

अधिक माहिती अशी : औरंगाबाद येथील राजेश प्रकाश साळवे 25 नोव्हेंबर 2015 रोजी रात्री दहाच्या सुमारास माळीवाडा बसस्थानकात थांबले होते. आरोपी अतुल वाघमारे व अन्य पसार आरोपींनी त्यांना "औरंगाबाद येथे सोडतो,' असे म्हणून मोटारीत बसविले. शेंडीच्या पुढे गेल्यावर आरोपींनी त्यांना मारहाण करीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, असा 2 लाख 57 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटला. नंतर त्यांना वांबोरी फाटा येथे सोडून दिले. 

बार्शीत विकले सोने

साळवे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी सात जणांविरुद्ध अपहरण व दरोड्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांनी तपास केला. खटला सुरू होण्यापूर्वीच यातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी आरोपी वाघमारे यास अटक केली. त्याने या गुन्ह्यातील सोने सोलापूर जिल्ह्यातील उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील सराफास विकल्याचे सांगितले.

पाच साक्षीदार तपासले

खटल्यात सरकार पक्षाने फिर्यादीसह पाच साक्षीदार तपासले. न्यायालयाने अपहरणाबद्दल तीन वर्षे सक्‍तमजुरी व एक हजार रुपये दंड, दरोड्याबद्दल सात वर्षे सक्‍तमजुरी व एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सात महिने साध्या कैदेची शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. मोहन कुलकर्णी व ऍड. अनिल ढगे यांनी काम पाहिले. सहायक पोलिस उपनिरीक्षक भानुदास बांदल, हेडकॉन्स्टेबल पांडुरंग पाटील यांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders: 5 कोटींमध्ये संपला दशकभराचा वाद! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबईतील फ्लॅटही सोडावा लागणार

Monsoon Rain Formation : 'मॉन्सून'चा पाऊस ढगांत कसा तयार होतो? पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे आता होणार अधिक सोपे

Maharashtra Pilgrims Accident : तीर्थयात्रा ठरली अखेरची! महाराष्ट्राच्या भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; २ ठार, ३५ जखमी

Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही

Rohit Pawar: पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल रोहित पवारांची दिलगिरी; आगामी कालावधीत सर्वांनी एकत्र येणे गरजेच!

SCROLL FOR NEXT