Behind the agitation of Rahuri Agricultural University employees 
अहिल्यानगर

राहुरी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

रहेमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्‍टोबरपासून सुरू केलेले आंदोलन आज मागे घेण्यात आले. 

मुंबई येथे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दालनात खासदार विनायक राऊत, राजन विचारे, आमदार योगेश कदम, नितीन देशमुख, विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत कृषि सचिव एकनाथ डौले यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यात सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने राज्यातील कृषी विद्यापीठांना लवकर लागू करण्याचे, तसेच 10,20,30प्रमाणे आश्‍वासित प्रगती योजनेबाबत दिवाळीनंतर बैठक घेण्याचे आश्‍वासन मंत्री भुसे यांनी दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांनी दिली. 

डॉ. देवकर यांच्यासह डॉ. विठ्ठल नाईक (दापोली), डॉ. संजय कोकाटे (अकोला), डॉ. दिलीप मोरे (परभणी) बैठकीस उपस्थित होते. विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन आंदोलनाची वाटचाल, तसेच शासनाने दिलेल्या आश्‍वासनाबाबत माहिती देऊन विद्यापीठास आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र देणार असल्याचे डॉ. देवकर म्हणाले. 

आंदोलनासाठी उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. सचिन सदाफळ, मच्छिंद्र बेल्हेकर, मच्छिंद्र बाचकर, डॉ. संजय कोळसे, डॉ. कैलास कांबळे, गणेश मेहेत्रे, जनार्दन आव्हाड, संजय ठाणगे यांनी प्रयत्न केले. 

कुलसचिवांचे कौतुक 
समन्वय संघाने आतापर्यंत दिलेल्या सर्व निवेदनांसह विद्यापीठाच्या कुलसचिव मोहन वाघ यांनी शासनास दैनंदिन पत्रव्यवहार करून सरकार व विद्यापीठ कर्मचाऱ्यांशीमध्ये योग्य समन्वय ठेवला. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीचे कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

आंदोलक रोज मोर्चा घेऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयावर येत. कुलसचिव त्यांना नेहमी सामोरे जात. कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाकडे मांडत होते. 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : ताशी १८० किमी वेगाने धावली वंदे भारत ट्रेन, इंजिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातून एक थेंबही पाणी सांडले नाही, पाहा व्हिडिओ

Leopard Viral Video : गाईला बघून घाबरला बिबट्या, सीसीटीव्ही फुटेज पाहून म्हणाल; कोल्हापुरी नाद खुळा...

Latest Marathi Live Update News: आयटी दांपत्य फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई? आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Video Viral: किंग्स चार्ल्ससोबत फोटो नाही मिळाला अन् तेव्हाच निर्धार केला... वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षक अमोल मुझूमदारने सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरणादायी किस्सा

प्रणित मोरे आज बिग बॉसच्या घरात येणार? BB19 बाबत मिळाले नवीन मोठे अपडेट्स, तब्येत सुधारणा झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT