Ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : बालकांच्या अडचणी समजून घ्या; भाग्यश्री पाटील

त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आपण पालक आणि शिक्षक म्हणून कोठेतरी कमी पडत.

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर - बालकांना बऱ्याच गोष्टी आकलन क्षमतेअभावी सांगता येत नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आपण पालक आणि शिक्षक म्हणून कोठेतरी कमी पडत आहोत. समजतं, पण उमजत नाही, अशा अवस्थेतून बालक किंवा विद्यार्थी जात असतात. अशावेळी आपण त्यांचे मित्र बनायला हवे व त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन शेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा’ या विषयावर आयोजित शिबिरात न्यायाधीश भाग्यश्री पाटील बोलत होत्या.

मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. नंदकुमार जिवडे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के, डॉ. शरद कोलते, मुख्याध्यापिका राधिका जेऊरकर, ॲड. अभय राजे आदी उपस्थित होते. ॲड. जिवडे यांनी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

मुलांनी अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याही स्वरूपाचे चॉकलेट भेटवस्तू स्वीकारू नयेत. अनोळखी व्यक्ती भेटवस्तू देत असेल तर त्याबद्दल आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगून सावध करावे, त्याची तक्रार करावी, याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी विकास कर्डिले, कृष्णा कोंगे, वैभव दळवी आणि शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT