hsc result bhalavani scholl 
अहिल्यानगर

भाळवणीच्या शाळेने दहा वर्षांत केले हे रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा

भाळवणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये घेतलेल्य बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन नुकताच जाहीर झाला.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. विद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. विशेष बाब म्हणजे मागील १० वर्षांमध्ये ९ वेळा विज्ञान शाखेचा निकाल हा १०० टक्के लागला.

विज्ञानमध्ये हे आले अव्वल

कला शाखेनेही यशाची परंपरा कायम राखली. कला शाखेचा निकाल ८३.०५ टक्के लागला. विज्ञान शाखेत एकुण ७५ विद्यार्थी बसले होते. त्या पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सार्थक माणिक गायकवाड ८२.३१ टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम आला. दुसरा क्रमांक अनिकेत विनायक रोहोकले याने (७४ टक्के), तिसरा क्रमांक वैष्णवी शरद कदम (७१.८५) मिळविला.

कला शाखेतील पहिले तीन 

कला शाखेत प्रथम वृषाली बाळासाहेब महांडुळे ७१.८५, दुसरी आरती सुरेश खरमाळे (७१.६९) तिसरी क्रमांक अलिशा हलिम शेख (७०.३९) आली.

भाळवणी शाखेत मुलींची संख्या लक्षणीय आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलाच्या तुलनेत अधिक आहे. विद्यालयाच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मुरलीधर रोहोकले, सरपंच लीलाबाई रोहोकले, स्कूल कमिटीचे सदस्य सुकाभाऊ रोहोकले, गंगाराम भाऊ रोहोकले, माजी सरपंच बाबाजी तरटे, अशोक रोहोकले, प्राचार्य ए.वाय. हाडस, पर्यवेक्षक आढाव यांनी कौतुक केले.

यांचे मिळाले मार्गदर्शन

प्रा.जी.एल. म्हस्के, प्रा. एम पी दळे, प्रा. व्ही डी जावळे, प्रा. जी. डी. शिंदे, प्रा. एन एल राहिजं, प्रा. एस. पी. साठे, प्रा. पी. के. मोहिते, प्रा. ए. के. झरेकर, प्रा. बी. पी. धांडे, प्रा. काटे सर, प्रा. एस. सी. ठुबे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

NCERT New History Book: बाबर क्रूर विजेता तर औरंगजेब हा मंदिरे तोडणारा; ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या नव्या पुस्तकातील माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा खमंग 'गोड ढोकळा', सोपी आहे रेसिपी

Satara News:'महाबळेश्वरात अतिक्रमण हटविताना गोंधळ'; शासकीय कामात अडथळा, आठ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT