Bhandardara
Bhandardara sakal
अहमदनगर

Bhandardara Dam : पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; भंडारदरा धरण ९४ टक्के भरले, आज ओव्हर फ्लो होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

अकोले - भंडारदरा, निळवंडे जलाशय भरण्याच्या मार्गावर आहे. आज रविवारी भंडारदरा धरणामध्ये ९४ टक्के पाणीसाठा झाला होता. येत्या १२ तासात पाणीसाठा ९५ टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे. पाणीसाठा ९५ टक्क्यावर गेल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या धरण ओव्हरफ्लो झाल्याचे प्रशासन जाहीर करेल.

पाणलोट क्षेत्रात आठवडाभर कोसळलेल्या पावसाने उत्तर नगर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धरणांमधील पाणीपातळी समाधानकारक स्थितीत पोहोचली.

उत्तरेला वरदान ठरलेल्या भंडारदऱ्याच्या पाणीसाठ्याने आज सकाळी सहा वाजता १० हजार ३९० दशलक्ष घनफूटाची पातळी ओलांडली आहे. गेल्या तीन दिवसात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असतानाही धरणात ताशी १५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरु आहे.

या स्थितीतही भंडारदरा धरण येत्या १२ तासांतच तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता आहे. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाने १० हजार ५०० दशलक्ष घनफूटाची (९५ टक्के) पातळी गाठल्यानंतर हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे मानले जाते. आज सकाळी भंडारदऱ्याचा पाणीसाठा १० हजार ३९० दशलक्ष घनफूट (९४ टक्के) झाला होता. २४९ दशलक्ष घनफुट पाण्याची आवक झाली आहे.

भंडारदऱ्यासह जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठाही ७५ टक्के झाला असून निळवंडेत ८३ टक्के तर आढळा धरणात ७९.३३ टक्के पाणी जमा झाले आहे.

गेल्या पंधरा दिवसांत मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा व भोजापूर या सर्वच जलाशयांच्या पाणलोटात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यंदाच्या हंगामात मुळा खोऱ्याच्या तुलनेत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक आहे.    भंडारदरा धरण बहुतेक वेळा १५ ऑगस्टपूर्वीच ओव्हर फ्लो होते, असा इतिहास आहे. यंदाही याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला

 सद्यस्थितीत धरणाच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे.  गेल्या चोवीस तासात भंडारदऱ्याच्या पाणलोटातील रतनवाडीत ५९ मिमी, घाटघर येथे ६३ मि.मी., पांजरे येथे ४१ मि.मी., भंडारदरा येथे ३० मि.मी., वाकी येथे १९ मि.मी. तर निळवंडेत पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT