Bhandardara Dam Overflow  sakal
अहिल्यानगर

Bhandardara Dam Overflow : भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव; फटाके फोडून जल्लोष

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणात वेगाने आवक होत आहे. शुक्रवारी (ता.२) सायंकाळी ६ वाजता १० हजार ५२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला.

सकाळ वृत्तसेवा

अकोले : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणात वेगाने आवक होत आहे. शुक्रवारी (ता.२) सायंकाळी ६ वाजता १० हजार ५२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. त्यामुळे जलसंपदा विभागाने तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर केले. आढळा जलाशय १०० टक्के भरल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून जलोष केला.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, पाऊस टिकून राहिल्याने ओढे- नाले दुथडी भरून वाहत होते. धरण भरणार की नाही अशी भ्रांत असताना पावसाने जोरदार मुसंडी मारली.

धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भंडारदरा जलाशयात १० हजार ५२० दशलक्ष घनफूट साठा झाल्याने जलसंपदा विभागाने तांत्रिकदृष्ट्या जलाशय भरल्याचे सांगितले. उद्या सकाळी राष्ट्रवादीचे युवा नेते अमित भांगरे, सुनीता भांगरे, दिलीप भांगरे जलपूजन करून जलाशयात साडी-चोळी अर्पण करून पूजन करणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांनी सांगितले.

आढळा १०० टक्के

अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील ३९१४ हेक्टरचे सिंचन करणारा देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. १०६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेचा हा मध्यम प्रकल्प शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरल्याची अधिकृत माहिती जलसंपदाचे अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पात पूर्वीचाच ३६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रस्तावित

Ladki Bahin Yojana : सतेज पाटील यांना लाडकी बहीण योजना आवडली नाही? म्हणाले, योजनेने आमचा कार्यक्रम केला

७०० + विकेट्स अन् १५ हजार धावा... ; महान क्रिकेटपटू त्याच्याच देशासाठी झाला परका! क्रीडा मंत्रालयाने घातली बंदी

गिरीजाचं दैवी रूप पाहून नागेश्वरला भरणार धडकी; त्याच्याच हातून तिच्या पायावर होणार रक्ताचा अभिषेक, प्रोमो चर्चेत

RSSच्या शताब्दीनिमित्त पोस्टाचं तिकीट अन् खास नाणं जारी; PM मोदींनी केलं RSSचं कौतुक

SCROLL FOR NEXT