corona virus 
अहिल्यानगर

अकोल्याच्या भूमिपुत्र पोलिसास नाशिकमध्ये लागण, संपर्कातील भाचीचे कुटुंब क्वॉरंटाइन

सकाळ वृत्तसेवा


अकोले: तालुक्यातील माळीझाप येथे रहिवासी व सध्या नाशिकमध्ये स्थायिक एका जोडप्यास कोरोनाची झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हा कोरोना बाधित तरुण हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात आहे. त्यांच्या पत्नीचा अहवालदेखील पॉझिटीव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष बाब म्हणजे हा पोलीस कर्मचारी भाचीच्या संपर्कात आल्याने तिच्या कुटूंबास नगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. घरातील 17 जणांना आरोग्य विभागाने होमक्वारंटाईन केले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीझाप परिसरात एक तरुण गेल्या काही वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहे. त्याची ड्युटी मालेगाव येथे लावण्यात आली होती.

विशेष म्हणजे तो आजारी पडला तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मात्र, दि. 22 एप्रिल रोजी त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर 23 एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सगळी धांदल उडाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीस तपासले असता त्यांचादेखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. हा प्रकार गेला आठवडाभर गुपित राहिला.

मात्र, काल त्यांच्या सानिध्यात असलेली त्याची भाची आजारी पडल्याने त्यांनी सावध भूमिका घेत अकोले आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ तीन जणांना ताब्यात घेऊन आज दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

अर्थात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून त्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो. मात्र, कोणतीही धोका नको म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. तर, संंबंधित पोलीस कर्मचारी हे त्यांच्या घरी देखील आले होते. त्यामुळे, या सर्वांचे नमुने घेतले असून म्हाळादेवी केंद्राच्या अंतर्गत त्या कुटूंबातील 17 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले.

तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका यांनी याबाबत काळजी घेत या परिसरात कुणीही बाहेर पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

Vastu Tips: उशीखाली किंवा बेडवर औषधं ठेवताय? वास्तूमध्ये का मानले जाते अशुभ? जाणून घ्या नियम!

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

SCROLL FOR NEXT