Birthday celebrations on social media only
Birthday celebrations on social media only 
अहमदनगर

वाढदिवसाचा सोहळा...सोशल मीडियावरच होतो गावगोळा

दौलत झावरे

नगर : वाढदिवसाचा सोहळा म्हटलं की गावातील, कॉलनीतील मित्र परिवार गोळा होतो. मात्र, आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही वाढदिवसाला गोतावळा जमा करता येत नाही. मात्र, त्यातूनही काहींनी मार्ग काढत सोशल मीडियावर मित्र परिवार जमवण्यास सुरवात केली आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. तेव्हापासून ते आजपर्यंत कोरोनाबाधित सापडतच आहेत. मे महिन्यापर्यंत बाधितांचा आकडा कमी होतो. मात्र, आता त्यात वाढ झाली आहे. रोज 500 जण पॉझिटिव्ह निघत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांनी घरातील धार्मिक कार्यक्रमांसह घरभरणी, लग्नसोहळे आदी कार्यक्रम स्थगित केले आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात येणारे वाढदिवस स्थगित करता येत नसल्याने अनेकजण साध्या पध्दतीने ते साजरे करीत आहेत.

काहींनी वाढदिवस मित्रपरिवाराला न बोलविताच घरात साजरे केले. मात्र, हौशींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच संदेश तयार करून मित्रांच्या छायाचित्रांचा वापर करून पोस्ट व्हायरल करण्यास सुरवात केली आहे.

या संदेशात आमचे भाग्य विधाते, आमचे जिवलग मित्र, आमचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आदी प्रकारच्या उपाध्या स्वतःला दिल्या आहेत. वाढदिवसाला सोशल मीडियात का होईना गाव गोळा करण्याची प्रथा जिल्ह्यात चांगलीच रुढ झाली अाहे.  

शुभेच्छा संदेश व्हायरल करण्यासाठी गळ 
समाजात प्रतिष्ठा मिळविणारे स्वतःच संदेश तयार करून ते मित्र परिवाराला पाठवून फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्‌विटर आदी सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यासाठी गळ घालत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT