BJP also became a Xerox copy of Congress 
अहिल्यानगर

भाजपही झाली काँग्रेसची झेरॉक्स कॉपी, युवा मोर्चाच्या निवडीतही घराणेशाही

अमित आवारी

नगर ः काँग्रेसच्या ध्येयधोरणावर भाजपचे चाणक्य नेहमी टीका करतात. विशेषतः काँग्रेसच्या घराणेशाहीवर त्यांचा नेम असतो. मात्र, पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपलाही घराणेशाहीची बाधा झाली आहे. लोकसभा, विधानसभे निवडणुकीतही नेत्यांच्या घरात तिकीट वाटप होते. मात्र, आता अगदी युवा कार्यकारिणीतही ही घराणेशाही आली आहे. 

नगरमध्ये आज जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणीतील  निवडीवरून दिसून आले. या कार्यकारिणीत नगर आणि नेवासा तालुक्याला झुकते माप देण्यात आलं आहे.

भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी अक्षय कर्डिले, गणेश कराड यांची निवड करण्यात आली. 

उपाध्यक्षपदी शिवाजी बेरड, अमोल शेलार, तुषार पवार, उमेश भालसिंग, महेंद्र तांबे, धनंजय मोरे, अमोल गर्जे, संजय कार्ले यांची निवड करण्यात आली. चिटणीसपदी अनिल गदादे, उदय पवार, सचिन पालवे, राजकुमार लोखंडे, दत्तप्रसाद मुंदडा, अभिजित रोहकले, मच्छिंद्र बर्वे, अभिजित जवादे यांचीच निवड करण्यात आली. 

प्रसिद्धीप्रमुख - राहुल संभाजी लांडे ,खजिनदार -विवेक भानुदास बेरड यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे : गणेश अशोक झावरे , भाऊसाहेब निवृत्ती खुळे ,प्रभाकर सोपान जाधव ,विकास संभाजी काळे ,सागर बाळासाहेब कल्हापुरे ,निलेशकुमार साहेबराव दरेकर ,योगेश आदिनाथ कासार ,संजय भाऊसाहेब कदम ,ईश्वर दादासाहेब मुरुमकर ,हरिभाऊ मछिंद्र वायकर ,विक्रमसिह शिवाजीराव जाधव ,सोमनाथ वाखारे ,गोपिनाथ जगताप ,अमोल बावडकर ,उदय लक्ष्मण शिंदे ,सोमनाथ विष्णुपंत अकोलकर ,राहुल केशरचंद बंब ,पांडुरंग नामदेव मोरे आदीचा जिल्हा कार्यकारणीत समावेश करण्यात आला.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT