BJP donated cylinders to Jamkhed Kovid Center 
अहिल्यानगर

जामखेड कोविड सेंटरला भाजपवाल्यांनी दिले सिलेंडर

वसंत सानप

जामखेड ः शहरातील कोविड सेंटरला समाजातून मदतीचा हात मिळत असताना, भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी लोकसहभागातून 166 ऑक्‍सिजन सिलिंडर नुकतेच दिले. यामुळे रुग्णांसाठी मोठी सोय झाली आहे. 

ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत हे सेंटर सुरू असून, या प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे आणि डॉ. शोभा आरोळे ही भावंडे कोविड सेंटरचे काम पाहतात. शासनाच्या माध्यमातून तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे समन्वयकाच्या भूमिकेतून नियोजनात सक्रिय आहेत. 

मंत्री शिंदे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. जामखेड भाजपच्या वतीने 71 सिलिंडरचा पुरवठा संबंधित कोविड सेंटरला करण्यात आला. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती अमित चिंतामणी यांनी स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 40 सिलिंडर दिले.

ज्योतीक्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी 55 सिलिंडर दिले. 

सिलिंडरची हवी मदत 
येथील कोविड सेंटरला रोज 90 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज भासते. हे लक्षात घेऊन विविध क्षेत्रांतील दानशूरांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. येथील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरकरिता इंधनाची गरज आहे. त्यासाठी पेट्रोल पंपचालकांनी मदत करावी, अशी अपेक्षा कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे. 

शेतकरी करतात अन्नधान्य पुरवठा 
विनामूल्य उपचार घेऊन बरे झालेले शेतकरी घरी गेल्यानंतर कोविड सेंटरसाठी स्वयंस्फूर्तीने अन्नधान्याचा पुरवठा करीत आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशीद, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, भाजीपाला व्यापारी संघटना यांनीही कोविड सेंटरला अन्नधान्य, किराणा, भाजीपाला व इतर आनुषंगिक साहित्याचा पुरवठा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT