अहिल्यानगर

मराठा, ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील ः राम शिंदे

दत्ता इंगळे

अहमदनगर ः ही वेळ महाविकास आघाडीमुळे आली आहे. ओबीसीसह मराठा आरक्षणही याच सरकारमुळे गेले. कोरोना काळात ठाकरे सरकारने दुर्लक्ष केल्याने भाजपवर आंदोलनाची वेळ आली. ओबीसीचे आरक्षण पुनर्स्थापित झाले पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.

(BJP's agitation for Maratha, OBC reservation)

ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने भाजपच्या वतीने नगर शहरातील सक्कर चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री राम शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, शहराध्यक्ष भय्या गंधे, नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, अक्षय कर्डिले, सुनील रामदासी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबाद-पुण्यावर रस्त्यावर हे चक्का जाम करण्यात आले होते.

भारतीय जनता पक्षाने वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आघाडी सरकारचे कोणत्याही प्रश्नात लक्ष नाही. या सरकारविरोधात जनतेत रोष आहे. मराठा आरक्षणासाठीही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. सर्व स्तरात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

सरकारचा नाकर्तेपणा

मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टातून रद्द झाले. राज्य सरकारने योग्य मांडणी न केल्याने, त्यांच्या नाकर्तेपणामुळे लोकांना भोगायचे आले आहे. कोविडच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त मृत्यूदर आहे. या सरकारला कोणता प्रश्न सोडवता आलेला नाही. सरकारने आरक्षणाबाबत न्यायालयात पुन्हा मांडणी केली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन भाजप करेन. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. सरकारचे लक्ष नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.

आंदोलक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर बायपास येथे नेऊन त्यांना सोडून देण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलक नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. (BJP's agitation for Maratha, OBC reservation)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT