BJP's agitation in Nagar Tehsil office
BJP's agitation in Nagar Tehsil office 
अहमदनगर

नगर तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ

दत्ता इंगळे

नगर तालुका ः तालुक्‍यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्‍या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्‍याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, प्रदेश पदाधिकारी युवराज पोटे, रमेश पिंपळे, दीपक कार्ले, अर्चना चौधरी, नंदा चाबुकस्वार, बाप्पूसाहेब बेरड, भाऊसाहेब काळे, महेश लांडगे, राजू दारकुंडे आदी उपस्थित होते. 

तालुकाध्यक्ष कोकाटे म्हणाले, राज्य सरकार हे अत्यंत निष्क्रिय स्वरूपाचे सरकार असून या सरकारला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नसून, यांना फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच आनंद असून कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना, राज्य सरकार व प्रशासन अतिवृष्टी, कर्जमाफी, दूध दरवाढ याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

नगर तालुक्‍यातील फक्त दोन महसूल मंडलातीन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून, बाकी मंडलात पंचनाने करण्याचे आदेश दिलेले नाहीत हे तालुक्‍याचे दुर्भाग्य आहे. 

नगर तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता आर्थिक मदत करावी, दुध दरवाढ करावी तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळवून द्यावी अशी मागणी या वेळी तहसीलदार याच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT