The body of the abducted girl was found in a well 
अहिल्यानगर

खळबळजनक ः अपह्रत मुलीचा मृतदेह आढळला पाण्यावर तरंगताना

विलास कुलकर्णी

राहुरी : ब्राह्मणी येथे शुक्रवारी (ता. १२) रात्रीपासून राहुटीतून बेपत्ता झालेल्या ऊस तोडणी मजुराच्या साडेचार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आज (सोमवारी) सकाळी नऊ वाजता जवळच्या एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला. राहुरी पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला आहे.

चिमुकलीचा खून करून, मृतदेह विहिरीत टाकला असल्याच्या संशय असून, तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. अशी माहिती पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.

शनिवारी (ता. १३) दिवसभर कुटुंबातील नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला. परंतु, मुलगी सापडली नाही. मुलीच्या वडिलांनी शनिवारी रात्री राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. तेंव्हापासून पोलीस मुलीचा शोध घेत होते.

काल (रविवारी) पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह आठ पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथकाचे २० पोलीस कर्मचारी, श्वानपथक यांनी दिवसभर शोधमोहीम राबविली. परंतु, यश आले नाही.

आज (सोमवारी) सकाळी नऊ वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र तांबे (रा. ब्राह्मणी) यांचे बंधू अनिल तांबे त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले. ते विहिरीत डोकावले असता, त्यांना लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात माहिती कळविली. ऊस तोडणी मजुरांच्या राहुट्यांपासून एक हजार फूट अंतरावरील विहिरीत मृतदेह आढळला आहे. 
        

ऊस तोडणी मजुराच्या साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. मुलीचा खून झाला असल्याची शक्यता आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. तपासणी अहवालात नेमके कारण स्पष्ट होईल.

- हनुमंत गाडे, पोलीस निरीक्षक, राहुरी अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT