The body of ADCC Bank branch officer Gaikwad was found 
अहिल्यानगर

एडीसीसी बँकेच्या वाकडीच्या शाखाधिकाऱ्यांचा मृतदेह आढळला

गौरव साळुंके

श्रीरामपूर : येथील वाकडी- रामपूरवाडी (ता. राहाता) शिवारात जिल्हा बँकेच्या वाकडीचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर मनोहर गायकवाड (वय ४५ ) मृतावस्थेत आढळले. 

प्रवाशांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करुन याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी घटनास्थळी जावून त्यांना शिर्डी येथील साई सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने हलविले. 
परंतु रुग्णालयात पोहचण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. 

मृतदेहाच्या उत्तरणीय तपासणीनंतर गुरुवारी (ता.२५) सकाळी साकुरी (ता. राहता) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. बुधवारी (ता.२४) दुपारपासून त्यांचा फोन बंद येत असल्याने कुटुंबाकडुन त्यांचा शोध सुरू होता.

दरम्यान, वाकडी- रामपुरवाडी (ता. राहाता) शिवारात बुधवारी सायंकाळी गायकवाड बेशुध्द अवस्थेत राहता- चितळी रस्त्यानजीक आढळल्याचे राजीव गायकवाड यांनी सांगितले. 
याबाबत शिर्डी पोलिसांच्या माहितीनुसार येथील तालुका पोलिस ठाण्यात आज सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार अशोक आडांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT