The body of a missing person was found 
अहिल्यानगर

बेपत्ता व्यक्ती सापडला, पण हाती सांगाडाच! शेवगावात खळबळ

राजू घुगरे

अमरापूर : आखातवाडे (ता. शेवगाव) येथील ढोरा नदीच्या पुलाखाली 45 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा आज दुपारी आढळला. पोलिस तपासात हा सांगाडा बाळासाहेब शाहू कटारनवरे (वय 45, रा. आपेगाव) यांचा असल्याचे कपड्यांवरून निष्पन्न झाले. याबाबत नातेवाईकांनी सहा महिन्यांपूर्वीच बाळासाहेब बेपत्ता झाल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती. हा सांगाडा न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. 

आपेगाव येथून घरी काहीही न सांगता, 13 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी बाळासाहेब कटारनवरे निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा अजय कटारनवरे याने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, सहा महिन्यांपासून त्यांचा तपास लागला नव्हता. ढोरा नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, पात्रात बरेच दिवस पाणी होते. आता पाणी कमी झाल्यावर आखातवाडे येथील पुलाखालील मोऱ्यामध्ये काही नागरिकांना काल दुपारी काटवनात मानवी सांगाडा दिसला.

सेवा संस्थेचे अध्यक्ष रघुवीर उगले यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे कवटी व हाडाचा सापळा दिसला. त्यावर पांढरा शर्ट, निळसर पॅंट पाहून कटारनवरे यांच्या कुटुंबीयांना ओळख पटली. कटारनवरे यांच्या मृत्यूबाबत चर्चा सुरू आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT