body of a kidnapped five-year-old boy has been found with his limbs amputated
body of a kidnapped five-year-old boy has been found with his limbs amputated  Sakal
अहमदनगर

पाच वर्षांच्या सत्यमची निर्घृण हत्या; चार संशयित ताब्यात

सुनिल गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : तालुक्यातील देडगाव येथील अपहरण झालेल्या सत्यम संभाजी थोरात या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह देडगाव-माका शिवारातील शेतात तब्बल सहा दिवसांनी सोमवारी (ता. २५) सायंकाळी सापडला. त्याचे दोन्ही हात, उजवा पाय घोट्यापासून तोडलेला व गळा चिरलेला होता. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

देडगाव येथे बुधवारी (ता. २०) यात्रा होती. त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सत्यमचे अपहरण झाले होते. तशी फिर्याद त्याची आजी प्रमिला शिवाजी थोरात यांनी नेवासे पोलिसांत दिली होती. सोमवारी (ता. २५) सायंकाळी देडगाव-माका शिवारातील एका शेतकऱ्यास सत्यमचा मृतदेह शेतात आढळला. त्याने याबाबत देडगावच्या सरपंच माहिती दिली. सरपंचांनी नेवासे पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत नेवासे फाटा येथे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, घटनास्थळाला पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रमिला थोरात यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी आरोपी गणेश शेषराव मोरे, रमेश शेषराव मोरे, प्रमोद अंकुश थोरात, विनायक अंकुश थोरात (सर्व रा. देडगाव, ता. नेवासे) या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.


हत्ये'ला हत्येची किनार.!

संशयित गणेश व रमेश मोरे बंधू यांचे वडील शेषराव पांडुरंग मोरे (वय ५०) व मृत सत्यमचे वडील संभाजी थोरात यांचे दारूच्या नशेत ऑक्टोबर २०१९ मध्ये वाद झाला होता. त्यात थोरात यांनी शेषराव मोरे यांचा लाकडी दांडक्याने ठेचून खून केला होता. याप्रकरणी थोरात यांना शिक्षाही झाली. त्यामुळे सत्यमच्या हत्येच्या संशयाची सुई सहाजिकच मोरे बंधूंकडे वळते. असे असले तरी पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत.

अपहरण झालेल्या सत्यमची हत्या झाली असून, याप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे. हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, हे तपासादरम्यान उघड होईल.
- बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, नेवासे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT