body of the married woman was found in the well 
अहिल्यानगर

विहरीत आढळला विवाहितेचा मृतदेह; माहेरच्यांना घातपाताचा संशय

सकाळ डिजिटल टीम

राहुरी (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कुक्कडवेढे येथे आज (बुधवारी) शेतातील विहिरीत एका विवाहित तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळला. मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून सासरच्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (body of the married woman was found in the well)

छाया शिवाजी भुसारे (वय २८, रा. कुक्कडवेढे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

बऱ्याच महिन्यांपासून, माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरी शारीरिक व मानसिक छळ होत होता. सासरच्या त्रासाबाबत तिने माहेरच्या लोकांना सांगितले होते. शिवाजी आसाराम भुसारे (पती), आसाराम मारुती भुसारे (सासरे), यमुनाबाई आसाराम भुसारे (सासू), गीताबाई रमेश पंडित (नणंद) यांनी घातपात केल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी शिवाजी आसाराम भुसारे (पती), आसाराम मारुती भुसारे (सासरे), यमुनाबाई आसाराम भुसारे (सासू) या तिघांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT