Breaking: District Sports Officer Kavita Navande arrested by the administration ... 
अहिल्यानगर

ब्रेकिंग ः जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांना प्रशासनाने घेतले ताब्यात...काय आहे प्रकरण

संजय आ. काटे

श्रीगोंदे : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष आदेश दिले आहेत. त्यात जिल्हाबंदीचाही आदेश आहे. मात्र, त्याच्या या आदेशाला प्रशासनातीलच अधिकारी हरताळ फासत आहेत. संगमनेरच्या नायब तहसीलदारांनी उल्लंघन केले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, आज पुन्हा एका जबाबदार अधिकारी महिलेने त्याची पुनरावृत्ती केली. त्या नगर जिल्हा क्रीडाधिकारी आहेत. त्यांना ताब्यात घेतले आहे.

पुणे ते नगर असा रोजचा प्रवास विनापरवाना करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना महसुलाच्या पथकाने आज सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

माळी म्हणाले, नावंदे या नगरवरून रोज पुण्याचा प्रवास करतात. मात्र, त्यासाठी त्यांनी अधिकृत कुठलाही परवाना घेतलेला नाही. तरीही त्या प्रवास करतात. आज सकाळी त्यांना अशाच प्रवासादरम्यान पुणे नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे त्यांचे वाहन श्रीगोंद्याच्या निवासी नायब तहसीलदार चारुशीला पवार व योगीता ढोले यांच्या पथकाने थांबविले.

परवान्याची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, अशा हालचाली सुरू आहेत.

नावंदे नगरला आल्यापासून वादग्रस्त ठरत आहेत. त्यांच्या निर्णयाविरोधात नगरच्या क्रीडा संघटनांनी आवाज उठवला होता. त्यामुळे प्रशानाने दुसरा क्रीडाधिकारी नगरला पाठविला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT