No case has been registered against District Sports Officer 
अहिल्यानगर

ब्रेकिंग न्यूज ः जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांवर गुन्हाच दाखल होईना...महसूल-पोलिसांची टोलवाटोलवी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : विनापरवाना प्रवास करून  जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना महसुलाच्या पथकाने आज सकाळी ताब्यात घेतले खरे, मात्र चार ते पाच तास झाल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. फिर्यादी कोण होणार यावरून महसूल व बेलवंडी पोलिसांमध्ये तू तू मै मै सुरू आहे.

नावंदे यांनी नगर ते पुणे असा प्रवास अधिकृत कुठलाही परवाना न घेता केल्याचा ठपका तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशावरून ठेवला आहे. आज सकाळी पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे त्यांचे वाहन श्रीगोंद्याच्या निवासी नायब तहसीलदार चारुशीला पवार व योगीता ढोले यांच्या पथकाने थांबविले.

परवान्याची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, असे माळी यांनी सांगितले. प्रत्यक्षात नावंदे यांना ताब्यात घेऊन चार ते पाच तास उलटल्यानंतरही बेलवंडी पोलिसात त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल झाली नव्हती. त्यांना बेलवंडी ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे.

तहसीलदारांचे असे आहे म्हणणे

तहसीलदार माळी म्हणाले, अशा घटनेत फिर्यादी पोलिसांनी व्हावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांचे आहेत. त्यामुळे  बेलवंडी पोलिसांना तसे कळविले अाहे.जिल्हाधिकारी यांचे आदेश त्यांना बंधनकारक आहेत.

पोलिस म्हणतात...

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने म्हणाले, नावंदे यांना महसुलाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे फिर्यादी त्यांनाच व्हावे लागेल. आमची कारवाई असली तर आम्ही फिर्याद दिली असती, याबद्दल वरिष्ठांच्या सूचना आहेत.

कोणाचा दबाव आहे का

कॉमन मॅन असेल तर प्रशासन लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून मोकळे होते. आता प्रशासनातीलच अधिकाऱ्याने जर कायदा मोडला असेल तर गुन्हा दाखल होण्यास इतका वेळ का लागतो, प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, अशीही चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT