Business is in trouble as there is less crowd of devotees in Shanishinganapur 
अहिल्यानगर

शनिशिंगणापुरात व्यावसायिकांपुढेच साडेसाती; दर्शनासाठी भक्तांचा ओघ कमी 

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : राज्य सरकारने मंदीराची दारे उघडण्यास परवानगी दिली असली तरी दर्शनासाठी भक्तांचा ओघ कमी असल्याने व्यावसायिक अडचणीच्या साडेसातीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवशी शनिशिंगणापुर येथील शनिमंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन विश्वस्त मंडळाने रोज सहा हजार भाविकांनाच दर्शन देण्याचा निर्णय घेतला. 

कोरोनाची काळजी म्हणून पुजासाहित्य थेट शनिमुर्तीपर्यंत नेण्यास बंदी आहे. सहा हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र, चार हजारांच्या आतच भाविक येत आहेत. गावात चारशेहून अधिक पुजासाहित्याची दुकाने असुन स्टेशनरीचे शंभरहून अधिक दुकाने आहेत. सध्या काही हॉटेल वगळता सर्वच दुकाने सुरु झाले आहेत. शिर्डी-शनिशिंगणापुर मार्गावर पाचशेहून अधिक वाहनांची बेकायदा प्रवासी वाहतूक सुरु होती. शिर्डीत भाविकांसाठी रेल्वे सुविधा सुरु न झाल्याने खासगी वाहनातून भाविक येत नाहीत. परिणामी पुजासाहित्य विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

येथे दहा बाय पंधरा आकाराच्या दुकानाला दोनशे ते पाचशे रुपये रोज भाडे आहे. दुकानांवर पाचशे रुपये रोजाने तीन ते पाच कामगार लागतात. सध्या भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी असल्याने धंद्याचा ताळमेळ बसत नसल्याचे व्यावसायिक राजाराम दरंदले यांनी सांगितले. कोरोना स्थिती लक्षात घेवून भाविक पुजासाहित्य घेत नाही. अनेक जण तर चहा, नाश्‍ता व पाणी सुध्दा घेणे टाळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

Shikhar Shingnapur: शिखर शिंगणापूरच्या कळसाला मानाचा ध्वज; ‘हर हर महादेव’चा जयघोष, मध्यरात्री शिवपार्वती विवाह, काय आहे पारंपरिक प्रथा?

Quick and Healthy Breakfast: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल! झटपट बनवा प्रोटीनने भरपूर 'मसूर कटलेट्स'; हेल्दी आणि चवदार नाश्ता

SCROLL FOR NEXT