Businessmen march on the Collector's office 
अहिल्यानगर

कलेक्टरांच्या दारात लग्नबंदी उठवण्यासाठी व्यावसायिकांची वरात

अमित आवारी

नगर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. ती उठवावी, या मागणीसाठी जिल्हा मंडप, लाइट, फ्लॉवर्स डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बॅंड व वरातीसह मूकमोर्चा काढण्यात आला. या वेळी काही आंदोलकांनी काळे कपडे व झेंडे हाती घेतले होते. 

निवेदनात म्हटले आहे, की सरकारने कोरोनामुळे लॉन्स, मंगल कार्यालयांतील कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर बंधने घातली. त्यावर टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, डीजे, साऊंड, लाइट डेकोरेटर, इव्हेंट, फोटोग्राफर, बग्गीवाले, विविध कलावंत, आचारी, पुरोहित, ऑर्केस्ट्रा, प्रिंटिंग प्रेस आदी अवलंबून आहेत.

पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीची मर्यादा 500पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय, लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, उपाध्यक्ष पोपट राऊत, जाफर शेख, रघुनाथ चौरे, बबन म्हस्के, विकास पटवेकर, अमित शेटे, बाळासाहेब लगे, सौरभ तरटे आदी उपस्थित होते. 
याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदींनी तेथे जाऊन संघटनेस पाठिंबा दर्शविला. 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT