Crime sakal
अहिल्यानगर

Crime News : सोने विकायला आले अन् जाळ्यात अडकले; घरफोडी करणारी टोळी गजाआड

चोरीच्या सोन्याची विक्री करायला आलेले तीन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - चोरीच्या सोन्याची विक्री करायला आलेले तीन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून सहा लाख ६३ हजार ५०० रूपये किंमतीचे ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव येथे सरकारी दवाखान्याजवळ सापळा रचून ही कारवाई केली.

लखन विजय काळे (वय २२, रा. शेवगाव), गोरख हैनात भोसले (वय २४, रा. घोसपुरी, ता. जि. अहमदनगर), सोनाजी एकनाथ गर्जे (वय ५२, रा. गर्जेवस्ती, गेवराई रोड, शेवगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शेवगाव व पाथर्डी परिसरात घरफोडीचे अनेक गुन्हे केले आहेत.

शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील महादेव मुरलीधर मुंढे (रा. पिंगेवाडी, ता. शेवगाव) यांच्या घराचे कुलुप तोडून आरोपींनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली.

आरोपी लखन काळे हा चोरीचे सोने एका मध्यस्थीमार्फत विकण्यासाठी शेवगाव येथे सरकारी दवाखान्याजवळ येणार होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख ६३ हजार ५०० रूपये किंमतीचे ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलीस अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे, रवींद्र कर्डीले, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजू काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर आदींनी ही कारवाई केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार रडारवर

पोलिस प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे हिस्ट्रीसिट तयार केले आहे. त्यात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांच्या काही टोळ्यांचाही समावेश आहे. या टोळ्या सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. काही टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या आहेत, तर काहींचा शोध सुरू आहे.

सहा गुन्हे उघड

आरोपींनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली. पाथर्डी, शेवगाव परिसरात आरोपींनी हे गुन्हे केले आहेत. त्यात आरोपी लखन विजय काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द दरोडा, घरफोडी व चोरीचे एकुण चार गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपासात आरोपींबाबत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT